पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे हिंजवडी येथील वाहतूक व्यवस्थेत बदल

0
पिंपरी चिंचवड :  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 18) रोजी बालेवाडी येथे हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या फेज तीनचे भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्थेत वाहतूक पोलिसांनी बदल केले आहेत. या कार्यक्रमासाठी येवू इच्छिणार्‍या नागरिकांना कार्यक्रमस्थळी दुपारी साडे तीनपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कार्यक्रमासाठी आलेल्या व्हीव्हीआयपी’ व व्हीआयपीं’साठी बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिंड येथे पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. तसेच इतर नागरिक व हिंजवडी येथील इंजिनिअर्ससाठी महाराजा गेट येथून प्रवेश देण्यात आला आहे. तर ज्यांनी चार चाकी वाहने आणली आहेत. त्यांना हॉटेल हॉलिडे इन येथे चारचाकी पार्क करून कार्यक्रमस्थळापर्यंत चालत यावे लागणार आहे. तसेच बसमधून येणार्‍या कार्यकर्त्यांसाठी महाराजा गेट येथे उतरुन कार्यक्रमस्थळी चालत जावे लागणार आहे, असे पोलिसांनी कळविले आहे.