संत बाबा हरदासराम सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स ; लोकसभेच्या उमेदवारांसह आमदार, पदाधिकार्यांची उपस्थिती
जळगाव- चौकीदार म्हणजे ड्रेस, टोपी, व्हीसल घातलेला माणूस नसून तो देशाचे संरक्षण करणारा आहे. देशाचा चौकीदार हा महत्वपूर्ण घटक असून देशाला लुटणारा, टॅक्स वाचविणारा एकही त्याच्या नजरेतून वाचणार नाही. त्यासाठी चौकीदाराचे काम अतिशय चोखपणे सुरु आहे. देशाच्या जनतेनेही या चौकीदाराला पसंती दिल्याने राजा, महाराजांची गरज भासणार नाही. राजकारण डोळयांसमोर ठेवून देशाचा विचार केला असता, तर कधीच पंतप्रधान झालो नसतो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरातील उमेदवारांशी मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत बाबा हरदासराम सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार, पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सर्वसामान्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरे दिली. यावेळी जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ, आ. राजुमामा भोळे, महापौर सिमा भोळे, जिल्हासंघटक तथा जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, नगरसेवक कैलास सोनवणे, ललीत कोल्हे, राजेंद्र घुगे, भगत बालाणी, सरीता नेरकर, विशाल त्रिपाठी याच्यासह सर्व नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.
लुटणारे 2019 नंतर जेलमध्ये असतील
माझ्यासाठी फक्त देश महत्वाचा आहे. मागील 40 वर्षापासून देश आंतकवादाशी झुंज देत होता. देशातील सैनिकावर विश्वास असल्यानेच एअर स्ट्राईक करून सैनिकाच्या मृत्यूचा बदला घेण्यात आला. यावेळी फक्त देशाचा विचार केला. यात कुठलेही राजकारण केले नाही. तसेच ज्यांनी देशाला लुटण्याचा प्रयत्न केला आहे. 2019 नंतर ते जेलमध्ये असतील. कुठल्याही कानाकोपर्यात लपविलेली मालमत्ता लपून राहणार नाही, असे म्हणत जवळपास दीड तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.