जळगाव । प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यास सन 2016-17 वर्षात 30 हजार गॅस संच वाटप करण्याचे उद्दीष्टे 87 टक्के म्हणजे 26 हजार 91 गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन देण्यात आले असून येत्या सन 2017-18 वर्षात 20 हजार गॅस योजनेचा टप्पा शंभर टक्के पुर्ण करणार असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास हरीमकर यांनी दिली.
भारत गॅस, एचपी गॅस आणि इंण्डियन गॅस असे तीन वर्गवारी असून जिल्ह्यात भारत गॅस -31, एचपी गॅस-19 आणि इंण्डियन गॅस-23 असे 73 गॅस वितरक असून एकुण केवायसी माध्यम प्रक्रिया पुर्ण करून एकूण 47 हजार 281 लाभार्थींना पात्र ठरले. या पात्र ठरलेल्यांमध्ये भारत गॅस -8 हजार 653, एचपी गॅस- 8 हजार 58 तर इंण्डियन गॅस-9 हजार 380 असे एकूण 26 हजार 91 लाभार्थींना गॅस जोडणी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी त्वरीत आवश्यक कागदपत्रांसह जवळील गॅस वितरक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.