पंतप्रधान कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश ठक्कर यांचे निधन

0

नवी दिल्ली-पंतप्रधान कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ पत्रकार जगदीश ठक्कर यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये उपचार सुरु होते. काल रात्री त्यांचे निधन झाले.

जगदीश ठक्कर यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ठक्कर हे वरिष्ठ पत्रकार होते, त्यांच्या सोबत गुजरात आणि दिल्लीत काम केले आहे. ठक्कर यांनी याआधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेले आहे. अतिशय कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व होते असे सांगितले आहे.