पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला आशा वर्कर्सशी संवाद

0

नवी दिल्ली-देशाला आरोग्याच्या बाबतीत स्वस्थ आणि सक्षम बनविण्यात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम सेविकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम सेविकांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

हे जबाबदारी तुम्ही पार पाडाल असा विश्वास देशाला आणि मला तुमच्यावर आहे असे देखील मोदींनी यावेळी सांगितले. देशातील कुपोषणाविरुद्ध, अस्वच्छता आदी समस्येविरोधात आपल्याला लढा द्यायचा असल्याचे मोदींनी सांगितले.