पंतप्रधान मोदींच्या राज्यात ईव्हीएम मशीन्सकडे अदृश्य शक्ती – राहुल गांधी

0

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच संपला.आता निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे 11 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदींच्या राज्यात देशभरातल्या ईव्हीएम मशीन्सकडे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी एका घटनेचे उदाहरणही दिले आहे.

मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली. ही बस दोन दिवस गायब होती. यावरूनच हे लक्षात येते की मोदी सत्तेवर असताना भारतात ईव्हीएमकडे अदृश्य शक्ती आहेत.

राहुल गांधी यांच्या टीकेला आता भाजपाचे नेते कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यातल्या विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही राज्यात काय होईल हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे. मध्यप्रदेशातली सत्ता गमावणं हा भाजपासाठी मोठा धक्का असू शकतो.