पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसला अपघात; ३५ विद्यार्थी जखमी

0

शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील ३५ विद्यार्थी जखमी झाले असून हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.

कांगडातील लंज भागात एका कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला गुरुवारी सकाळी अपघात झाला. पंतप्रधान मोदी यांच्या धर्मशाळा येथील रॅलीत सहभागी होण्यासाठी ही बस विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या अपघातात ३५ विद्यार्थी जखमी झाले. घटनास्थळी प्रथमोपचाराची सोय नसल्याने या विद्यार्थ्यांना जमीनीवर झोपवूनच प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना लंजमधील सीएचसी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी विद्यार्थी २० ते २४ या वयोगटातील आहेत. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.