नवी दिल्लीः करोना व्हायरसवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात एक खास वेबसाइट लाँच केली आहे. या वेबसाइटचे नाव ‘कोविड वॉरियर्स’ असे आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून संघटन, स्थानिक प्रशासन आणि सिव्हील सोसायटीतील कर्मचारी एकमेकांशी जोडले जाणार आहेत.
या प्लॅटफॉर्मवर डॉक्टर्स, नर्स, आशा कर्मचारी, एनएसएसची माहिती उपलब्ध आहे. या वेबसाइटवर करोना व्हायरस संदर्भातील माहिती मिळणार आहे. तसेच या प्लॅटफॉर्मवर सर्व राज्यांचा डेटा उपलब्ध आहे. तसेच लोकांना या ठिकाणी डॉक्टरची माहिती मिळू शकते. तर दुसरीकडे यात विद्यार्थी, डॉक्टर, हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटलचे कर्मचारी, माजी सैनिक, फार्मसीचे कर्मचारी, आयुष विभागाचे कर्मचारी, लॅबचे कर्मचारी, एनसीसी आणि पंचायत सचिव यांची माहिती उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर लोकांनी करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.