पंतप्रधान मोदींनी १८ वर्षात पहिल्यांदाच घेतली सुट्टी !

0

नवी दिल्ली: बहुचर्चित Man Vs Wild या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग होता. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने १८ वर्षात पहिल्यांदा सुटी घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. प्रसिद्ध जंगल सफरी करणारा बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामधील घनदाट जंगलांमध्ये भटकंती करताना दिसले. या भटकंती दरम्यान मोदींनी बेअरला त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्यामध्ये त्यांनी आपण जंगलामध्ये वास्तव्य केल्याचे काही किस्से सांगिले. जंगलात राहताना आपण खूप कमी वस्तू वापरुन जगायला शिकल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.

जगातल्या दिग्गज नेत्यांपैकी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे बेअर ग्रिल्ससोबत फिरताना दिसले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स जिम कॉर्बेट या ठिकाणी गेले होते. ही माझी मागच्या १८ वर्षातली पहिली सुटी होती असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून मी देशाचा विकास कसा साधला जाईल याच एका गोष्टीचा ध्यास घेतला आहे. मला बेअर ग्रिल्सने जेव्हा या शोबाबत विचारले तेव्हा मी त्याला हो म्हटले. त्याने मला पंतप्रधान म्हणून तुमची कारकीर्द कशी आहे हा प्रश्नही विचारला होता. तेव्हा गेल्या पाच वर्षात मी माझे काम केले. मला आणखी एक संधी मिळाली आहे आणि ही संधीही मला काम करण्यासाठी महत्त्वाची वाटते असंही मोदींनी म्हटलं आहे.