कोलकाता-पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची सभा मिदनापूरमध्ये सुरु होती आणि अचानक मांडव कोसळल्याची घटना घडली आहे. या दरम्यान कोणालाही इजा झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एका मांडवावर ताण आला आणि तो मांडव खाली कोसळला.
भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र त्यांचे भाषण सुरू असतानाच लोकांची गर्दी वाढल्याने मांडव कोसळल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतानाच ही घटना घडली. या घटनेनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.