पंतप्रधान यांची पत्रकार परिषद “मौन कि बात”: राज ठाकरे

0

मुंबई: काल ५ वर्षांनतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नाना बगल देत मौन बाळगले होते. त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली असून, पंतप्रधानांची पत्रकार परिषद.. “मौन कि बात” असे ट्वीट केले आहे.

काल १७ रोजी निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. मोदी, शहा जोडीने काल सयुंक्त पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेत मोदी हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळत होते. लोकसभा निवडणूक प्रचार सभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध प्रश्नावर टीकेचा भडीमार केला होता. देशाचे पंतप्रधान पत्रकारांसमोर जायला घाबरतात असे विधान राज यांनी गेल्या महिन्यात केले होते. काल झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकारांना उत्तर दिले होते. मोदी काही बोलतील असा अंदाज पत्रकारांना होता, पण ते काहीच बोलले नाही.

मोदींना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता, मी पक्षाचा एक शिस्तप्रिय सैनिक असून, प्रश्नाचे उत्तर अमित शहा देतील असे म्हटले होते. मागे झालेल्या आपल्या प्रचार सभेत यांनी मोदी हे देशातील असे एकमेव पंतप्रधान आहेत, जे पत्रकारांना घाबरतात. गेल्या ५ वर्षात मोदी यांनी एकपण पत्रकार परिषद घेतली नाही अशी टीका राज यांनी मोदींवर केली होती.