पंधरा बंगला भागातील अतिक्रमितांना न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषण

0

पर्यायी जागा देण्याची मागणी ; शिवसेना पदाधिकार्‍यांचा आंदोलनाला पाठिंबा

भुसवळ- शहरातील रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटवल्यानंतर त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. उपोषणार्थींनी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेली सर्वे क्रमांक 63/1 ही जागा मान्य नसल्याने सर्वे क्रमांक 181, 182, 183, 191, 192 या परीसरातील ओपन स्पेस तसेच सरकारी जागा देण्याची मागणी करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष मोहन निकम यांच्या नेतृत्वात उपोषण छेडण्यात आले आहे.

यांचा उपोषणात सहभाग
विनोद निकम, आनंद नरवाडे, दीपक सोनवणे, शेख रशीद शेख बशीर, सम्राट सुरेश बनसोडे, शेख मोहसीन शेख मजीद, संदीप करमजीत, सुनील सोनवणे यांच्यासह शेख सलीम अल्ला रजीया बी., शाईन बी., खुर्शीद बी., मुक्त्यार बी., गोपी म्यांद्रे यांच्यासह अन्य महिला व पुरूष उपोषणात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेतर्फे उपोषणाला पाठिंबा
अतिक्रमण मध्ये बेघर झालेल्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनेतून घरे मिळालीच पाहिजे, हा भारतीय संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार असून संविधानदिनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात व या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, असल्याचे बबलू बर्‍हाटे यांनी सांगितले. प्रसंगी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, शहर संघटक सुनील बागले, उपशहर प्रमुख राकेश खरारे, धनराज ठाकूर, पवन नाले, उपशहर संघटक सोनी ठाकूर, युवा सेना तालुका प्रमुख हेमंत बर्‍हाटे, मयूर जाधव, गौरव नाले, ऋषभ धांडे, भरत कुंभार, अनिकेत भिरुड उपस्थित होते.