मंत्री महादेवराव जानकर : भुसावळातील मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
भुसावळ- राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना 14 वर्षापासून झाली आहे मात्र पक्षाची जळगाव जिल्ह्यात समाधानकारक स्थिती नसल्याने कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय व धोरणे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवण्याची आवश्यकता असल्याची भावना मंत्री महादेवराव जानकर यांनी शहरात आयोजित मेळाव्यात व्यक्त केली. जामनेर रोडवरील भावसार मंगल कार्यालयात मंत्री महादेवराव जानकर यांच्या राज्यस्तरीय जिल्हा दौर्यानिमित्त जिल्हास्तरीय राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा गुरूवारी झाला. या मेळाव्यात मंत्री महादेवराव जानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना 14 वर्षापासून पक्षाची स्थापना झाली आहे मात्र जळगाव जिल्ह्यात पक्षाची समाधानकारक स्थिती नसल्याचे दिसून आले. यासाठी जिल्हा पदाधिकार्यांनी पुढाकार घेवून पक्षाची ध्येय व धोरणे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवून जनाधार वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद हडपे, प्रदेश महासचिव बाळासाहेब दाळतळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू पोथरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याला यांची उपस्थिती
भुसावळातील या मेळाव्याला जिल्हा प्रभारी भरत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला रेनकुंटवार, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भालेराव, डॉ.कैलास ठाकरे, नगरसेवक गणेश धनगर, संदीप देवरे, जीवन पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष रवी पवार, राजेंद्र चौधरी (एरंडोल) यांची उपस्थिती होती.
आमदार संजय सावकारेंनी केले स्वागत
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेवराव जानकर हे मेळाव्यापूर्वी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी त्यांचे स्वागत केले.