पटकथेची शाळा

0

सिनेमा लिहायला शिकताना
मुंबई विद्यापीठाच्या फुले-आंबेडकर अध्यासनाद्वारे 22 व 23 जून रोजी पटकथा लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक अनिल सकपाळ यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले होते. तर वक्ते म्हणून अनुभवी आणि प्रसिद्ध अशा व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन लाभले. यात प्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक प्रेमानंद गज्वी, प्रसिध्द नाटककार, कथा-पटकथा-संवादकार संजय पवार, बोधी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अशोक हांडोरे तसेच ऋढखख व ग ग डलहेेश्र ेष ईीं अशा संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन अनुभवात मुरलेले प्राध्यापक प्रकाश भिसे, विलास शिंदे, बापू सर्वगोड, श्याम रंजनकर अशा सर्वांचा समावेश होता. याचबरोबर पटकथा लेखक स्वप्नील गांगुर्डे, नाट्य अभिनेते दिवाकर मोहिते आणि पत्रकार राकेश शिर्के यांचीही उपस्थिती होती.

कार्यशाळेचे पहिलेच सत्र संजय पवार यांची पटकथा असलेला मी सिंधुताई सकपाळ बोलते…, हा चित्रपट दाखवून सुरू करण्यात आले. संजय पवार यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांचे लेखनानुभव आणि त्याच सोबत चित्रपट आणि लेखन विश्‍वातील अनेक चुकीच्या मान्यता आणि त्यांचे वास्तव यावर प्रकाश टाकला. चित्रपट नायक केंद्रीतच असावा, चित्रपट विषय नेहमीच बेस्टसेलर व्हावा ही निर्मात्यांची मागणी! लेखकांना मिळणारे दुय्यम महत्त्व, त्याचबरोबर एखादा लेखक चांगला लिहीत असला तर तो नक्कीच सर्व प्रकारचे लेखन करू शकतो! असा असणारा विश्‍वास आदी अनेक गैरसमज त्यांनी मांडले व त्यामुळे चित्रपटांवर होणार परिणामही मांडला.आपले स्वानुभव सांगताना नाटक आणि चित्रपट यांची पटकथा लिहिणं यात तत्वतः फरक आहे आणि तो जाणून तसे लेखन होणे अपेक्षित आहे हा मुद्दाही संजय पवार यांनी मांडला. सैराट चित्रपटानंतर सिनेसृष्टीत आलेली व्यापकता, बदललेले समज यावरही पवार यांनी मौलिक भाष्य केले. पण हेच सांगताना त्यांनी श्‍वास चित्रपटानंतर ऑस्कर आणि त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याच्या स्पर्धेत चित्रपट निर्मितीत होणारे बदलही प्रकाशझोतात आणले.निश्‍चलनीकरणाचे परिणाम सांगतानाच मराठी चित्रपटविश्‍वात कोठारे, तळवलकर आदींसारखे केवळ चित्रपट निर्मितीच करण्यार्‍या निर्मात्यांचा दुष्काळ जाणवल्याची सलही संजय पवार यांनी यावेळी मांडली. पटकथा लेखक आणि दिग्दर्शक यांचे नाते आणि त्याबद्दलचे अनुभव सांगताना ते म्हणाले, ऊळीशलीेीं ळी ींहश ेपश ुहे शपीळलहशी ींहश थीळींशी! पटकथा लिहिताना ती मांडणीबद्धच असावी आणि कॅमेराच्या दृष्टीने तिच्यात होणारे बदल याचे ज्ञान लेखकाला असण्याची आवश्यकताही मांडली. तसेच हिंदी सिनेसृष्टीत होणारे बदल आणि नव्याने येणार्‍या स्क्रिप्ट डॉक्टर यासारख्या चांगल्या संकल्पनांचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुसर्‍या सत्रात बापू सर्वगोड यांनी पटकथा लेखनाच्या तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. पटकथा लेखकाकडे दृश्य अनुभवातून निर्माण होणारे अनुभवविश्‍व आणि त्याच्याकडे असणारी शब्दसमृद्धी त्याला लेखनात अधिक मदत करते हा विचार त्यांनी मांडला. तांत्रिक बाबी समजून घेण्याच्या दृष्टीने करििू अपपर्ळींशीीरीू आणि ॠश्ररीी हे दोन लघुपट दाखवण्यात आले व त्यावर चर्चा करण्यात आली.

तसेच पटकथेच्या दृष्टीने महत्वाच्या अशा जागतिक चित्रपटांचे संदर्भ सांगण्यात आले व यादीही बनवण्यात आली. प्रत्येक क्षेत्रात होणारे व्यापारीकरण आणि प्रेक्षकांना हवे तेच तयार करायचे या दृष्टीला विरोध करत प्रेमानंद गज्वी यांनी एक नवा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, लोक ट्रेंड्स अनुसरतात हे खरे पण ते ट्रेंड्स आपण बदलवणे हे लेखक म्हणून आपली जबाबदारी आहे. बाजार अभिरुची बदलतं. रुची असलेल्या गोष्टीत उन्नत बदल निर्माण करत आपण अभिरुची बदलू शकतो हा विचार प्रेमानंद गज्वी यांनी मांडला. दुसर्‍या दिवशी प्राध्यापक अनिल सकपाळ यांनी आतापर्यंत देवदास या कादंबरीवर आधारित आलेल्या चार चित्रपटांतील काही दृश्य दाखवली. आणि त्यावरून पटकथेच्या दृष्टीने बदलणारे सांस्कृतिक, राजकीय संदर्भ तसेच पात्रांचे बदलते भावविश्‍व याचा आढावा घेतला. याचसोबत पटकथा लिहिताना दृष्टिकोनात दिसणारी एकरेषियता किंवा बहूआयामीपणा याचीही चर्चा करण्यात आली. यांनतर चित्रातून उलगडणारी कथा किंवा चित्र निर्मितीची प्रक्रिया हा एक वेगळा विषयसुद्धा कार्यशाळेत चर्चिला गेला. यावेळी चित्रकार विलास शिंदे यांची चित्रे आणि यासाठी त्यांनी घेतलेल्या शोधाची प्रक्रिया त्यांच्याच शब्दांतून ऐकण्यास मिळाली. याच चर्चेतून आजच्या कलाविश्‍वातील जाणिवा आणि उणिवा याचीही चर्चा करण्यात आली. यात प्राध्यापक प्रकाश भिसे यांनी आपले अनुभव मांडले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात श्याम रंजनकर यांचा अश्व हा लघुपट दाखवण्यात आला व त्यानंतर पटकथेच्या दृष्टीने चर्चा करून तांत्रिकदृष्ट्या जाणवणारे अधिक-उणे बदल याचीही चर्चा झाली. कार्यशाळेचा समारोप करताना नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या, एखादा विषय घेऊन त्यावर उपस्थित सगळ्यांनी आपली कल्पकता वापरून काहीतरी नवीन चांगले निर्माण करण्याच्या कल्पनेला सर्वानी एकमताने होकार दिला व त्यासाठी पुढील काही रूपरेषा ठरवण्यात आली.

अश्‍विनी माने  – 9773485382