पटेल फार्मसीची कविता चौधरी देशात पहिली

0

शिरपूर। येथील आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालामधील फार्मासुटीकल केमिस्ट्री विभागातील एम.फार्मसीची विद्यार्थिनी कविता सुर्यकांत चौधरी हिच्या प्रबंधास संपूर्ण भारतामधून केमिस्ट्री विषयामध्ये प्रथम क्रमांक नुकताच जाहीर झाला. तिने डॉ.हारून पटेल व डॉ. प्रीतम जैन यांच्यामार्गदर्शनाखाली क्षय रोगावर संशोधन करून शोध निबंध सादर केला होता.

डॉ.हारून पटेल व डॉ.प्रीतम जैन यांचे लाभले मार्गदर्शन
डी.एस.टी. (विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग), भारत सरकार व रजनीभाई पटेल टस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील शैक्षणिक संस्थामध्ये होणार्‍या संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून फार्माइनोव्हा बेस्ट थेसीस अवार्ड दरवर्षी देण्यात येतात. एम.फार्मसीच्या तसेच पी.एच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण व अभिनव कल्पनेवर संशोधनकरण्याची वृत्ती विकसित व्हावी यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येते. संपूर्ण देशभरातून औषधनिर्माणशास्त्र विषयाशी संबंधित विविधविषयावरील प्रबंध या अवार्डसाठीपाठविले जातात.विविध निकषांच्या आधारे सर्वोत्तम नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित प्रबंधाचीच अवार्डसाठी निवडकरण्यात येते. उपलब्धीसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष व उपनगराध्यक्ष मा. भूपेशाभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, तसेच उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे आणि प्राध्यापकांचे कौतुक केले. व उत्तरोत्तर अशीच प्रगती होत रहावी अशा शुभेच्छा दिल्या.