पटेल महिला महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन

0

शिरपूर । शहरातील एच.आर.पटेल महिला महाविद्यालयात युवती सभेचे नुकतेच उद्घाटन झाले. यासाठी खान्देशातील सुप्रसिद्ध वास्तूरचनाकार रवीजी बेलपाठक उपस्थित होते. यावेळी भाषणात रवीजी बेलपाठक ’महिला सुरक्षा व सक्षमीकरण’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात गार्गी, मैत्रेयी, जिजाऊ, सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, कल्पना चावला, किरण बेदी अशा अनेक महिलांचे दाखले दिलेत.यावेळी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राहुल सनेर म्हणाले कि देशाच्या विकासातील महिलांच्या योगदानासाठी महिलांनी सक्षम होणे हि काळाची गरज आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभेच्या अध्यक्षा डॉ.शोभा देवरे यांनी केले व सूत्रसंचालन डॉ.सोनल भामरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपाली मोरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्रा डॉ हेमंत दलाल उपस्थित होते.