शिरपूर । शिरपूर येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येऊन तंबाखू नियंत्रणाबाबत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करुन व्यसनाचे दुष्परीणाम स्पष्ट केले. विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायनेस क्लब शिरपूर यांचेही सहकार्य लाभले. सुरुवातीस नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, विद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही.पाटील, डॉ.नलिनी राठी, लायनेस क्लब अध्यक्षा संध्या जैन, सचिव निलम अग्रवाल, कोषाध्यक्षा वंदना भंडारी, विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एच.जाधव, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.वाघ, डॉ.सौ.बोडके, डॉ.अनिता राठोड, तस्निम जळगाववाला, सचिन जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यांनी सहभाग नोंदणी
याप्रसंगी संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, डॉ.वाघ, डॉ.सौ.बोडके, निलम अग्रवाल आदींनी मनोगत व्यक्त करुन व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. व्यसनाचे दुष्परीणाम लक्षात घेऊन व्यसनापासून स्वतः दूर राहण्याचे मान्यवरांतर्फे आवाहन करण्यात आले. शहरातून रॅली काढण्यात येऊन व्यसनमुक्तीपर जनजागृती करण्यात आली. या रॅलीत पदाधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक ए.एच.जाधव, रासेयो प्रमुख बी.एन.अहिरे, पी.टी.चौधरी, एस.आर.पाटील, एस.आर.देसले, ज्योती माळी, आर.ए.जोशी, ए.एम.राजपूत, बी.आर.पाटील, संजय शिंपी, एन.ई.चौधरी, सौ.गुलाब मराठे यांच्यासह लायनेस क्लबचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचलन उमेश शिंदे यांनी केले. आभार वंदना भंडारी यांनी मानले.