पटेल संकुलाच्या खेळाडूंची जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी

0

शिरपूर । येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या अनेक खेळाडूंनी बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून जयेश महाजन या खेळाडूने तिहेरी मुकूट प्राप्त केला आहे. धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विविध वयोगटात विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. 11 वर्षे मुलांच्या वयोगटात अर्नव गोपाल पाटील उपविजेता, 11 वर्षे मुलींच्या साची स्मितेश शहा उपविजेती, 13 वर्षे मुलांच्या वयोगटात आयूष विजय अग्रवाल उपविजेता, 15 वर्षे मुलांच्या वयोगटात निखील प्रविण मराठे विजेता, तेजस हंसराज पाटील उपविजेता, 17 वर्षे मुलांच्या वयोगटात आस्था गोपाल पाटील उपविजेता, 17 वर्षे मुलींच्या वयोगटात प्राजक्ता रतिलाल माळी विजेती, क्षितीजा मनोज पटेल उपविजेता, 17 वर्षे मुलांच्या वयोगटात रोशन मनोज पवार विजेता, निखील प्रविण मराठे उपविजेता, 19 वर्षे मुलांच्या वयोगटातजयेश राजेंद्र महाजन विजेता, यश गुलाब धनगर उपविजेता, 19 वर्षे मुलींच्या वयोगटात प्राजक्ता रतिलाल माळी उपविजेती, पुरुष दुहेरी गटात जयेश महाजन व यश धनगर यांनी विजेतेपद राखले तर रोशन पवार व निखील मराठे यांनी पुरुष दुहेरी गटात उपविजेतेपद राखले.

राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
या सर्व खेळाडूंमधून 17 व 19 वर्षे मुलींच्या वयोगटातून प्राजक्ता माळी, क्षितीजा पटेल, आस्था पाटील, 17 वर्षे मुलांच्या वयोगटात निखील मराठे, 17 व 19 वर्षे मुलांच्या वयोगटात यश धनगर, रोशन पवार, 19 वर्षे मुलांच्या वयोगटात जयेश महाजन, कौस्तुभ पाटील या आठ खेळाडूंची नागपूर येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, नाटुसिंग गिरासे, प्रितेश पटेल, डॉ. उमेश शर्मा, सर्व प्राचार्य, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांनी कौतुक केले आहे.