पटेल संकुलाच्या तीन आश्रमशाळांना‘आयएसओ ’मानांकन

0

शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी या आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या तीन आश्रमशाळांना आय.एस.ओ. मानांकन देऊन गौरविण्यात आले असून शिक्षण क्षेत्रातील हा फार मोठा बहुमान असल्याने संस्थेच्या प्रगतीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी, निमझरी व शिरपूर शहरातील आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा या तीनही आश्रमशाळांना संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली यांच्या द्वारे आय.एस.ओ. 9001 : 2015 सर्टिफिकेट मानांकन प्राप्त करत विशेष मानांकन प्राप्त झाले आहे. या सर्व यशस्वी शाळांच्या मुख्याध्यापकांचा प्रमाणपत्र व बक्षिस देऊन माजी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्था कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान बहाल करण्यात आला.

या मान्यवरांची होती उपस्थिती
शिरपूर तालुक्यासाठी ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. बद्दल माजी शिक्षणमंत्री संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक तपनभाई पटेल, गोपाल भंडारी, शैलेंद्र अग्रवाल, पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, नाटूसिंग गिरासे, सीईओ डॉ.उमेश शर्मा, गटशिक्षणाधिकारी प्रकाश रणदिवे, राजाराम हाडपे, दिलीप येशी, एस.टी.वाडिले, के.एम. सनेर, प्राचार्य एच.के.कोळी, प्राचार्य ए.पी.ठाकरे,प्राचार्य पी.डी.पावरा,मुख्याध्यापक पी.डी.कुलकर्णी, मुख्याध्यापक भटू माळी, मुख्याध्यापक आर.एस.कुलकर्णी, अशोक कलाल, बी.डी.शिरसाठ,व्यवस्थापक विलास माळी,सतीश ठाकरे, दीपक बारी, सर्व संचालक मंडळ, सर्व प्राचार्य यांनी कौतुक केले.