पट्टेदार वाघाचा पुन्हा हल्ला ; कुंडचा मच्छिमार तरुण जखमी

0
मुक्ताईनगर :- तालुक्यातील कुंड गावाजवळील जुन्या पुलाखाली 19 वर्षीय मच्छिमार पलिकडील तिरावर जात असतानाच पाठीमागून आलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवत तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
वाघाच्या या हल्ल्यात कुंदन उदयभान संगळकर (19) हा तरुण जखमी झाला असून त्यास अधिक उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच डोलारखेडा येथील शेतकर्‍याचा पट्टेदार वाघाने फडशा पाडल्याची घटना ताजी असतानाच पट्टेदार वाघाने पुन्हा हल्ला चढवल्याने घबराट पसरली आहे. दरम्यान, हा वाघ पाण्याच्या शोधार्थ कुंड येथे आल्याची माहिती आहे.