भिवंडी (रतनकुमार तेजे )- भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीची प्रलंबित असलेली नविन पाणिपूरवठा योजनेचे काम लवकरात लवकर सूरू करण्याची एकमुखी मागणी ग्रामस्थांनी आयोजित खास ग्रामसभेत केली.
सन २०१४ साली जिल्हा परिषद ठाणे यांनी मंजूर केलेली २ कोटी ७५ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना न्यायप्रविष्ट असल्याने प्रलंबित होती. त्यातील ग्रामसभेतील मंजूरी चुकीची असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांचां असल्याने नविन प्रशासकीय मंजुरी करीता सरपंच, संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, मानसी बोरकर यांच्या उपस्थितीत खास ग्रामसभेचे आयोजन जिल्हा परिषद शाळा, प्रांगणात करण्यांत आले होते. यावेळी नविन पाणी पूरवठा योजनेला मंजुरी देऊन काम लवकर सुरु करण्याची एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, राऊत, यांच्या उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी आपले विचार मांडले तर महिलांनी पिण्याच्या गढूळ पाण्याचे नमुने अधिकाऱ्यांना सादर केले. या ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ अमोल बिडवी, संजय पटेल, शैलेश बिडवी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी डी. एल. पावशे यांनी केले.