पतंगरावांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले : हर्षवर्धन पाटील

0

डॉ. पतंगराव कदम यांना इंदापूर काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

इंदापूर : पतंगरावांनी सुरवातीला पुणे येथे सदाशिव पेठेत एका अगदी छोट्या खोलीत दहा मुलांची प्राथमिक शाळा सुरू केली. आज त्यांच्या भारती विद्यापीठात पाच लाख मुले शिक्षण घेत आहेत. भारता बरोबर परदेशातही त्यांनी शिक्षण संस्था काढली आहे. भरती विद्यापीठाचे कुलपती स्वर्गीय पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले अशा शब्दात भावपुर्ण श्रध्दांजली राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाहिली. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने काँग्रेस भवन येथे पतंगराव कदम यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील बोलत होते.

राज्यावर दूरगामी परिनाम
पाटील पुढे म्हणाले, राज्यातील विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे व पतंगराव कदम हे तीन नेते गेल्यामुळे दूरगामी परिणाम होणार आहेत. मी आणि पतंगराव दोघे शेजारी रहात होतो.रोज सकाळी आम्ही दोघे फिरायला एकत्र जात असत. मी वयाने लहान असलो तरी ते माझ्याबरोबर अतिशय प्रेमाने वागत असत. एवढे ते दिलदार व सतत हसमुख असनारे नेते होते.आमच्या घराण्याचे व त्यांचे गेली अनेक वर्षापासुन घरोब्याचे संबध होते.

तू निवडून आल्याचा आनंद
पाटील म्हणाले सन 1995 साली त्यांचा विधानसभेत पराभव झाला. व पराभव होऊन देखिल ते मला मी प्रथम निवडून आल्यामुळे मुंबईला भेटायला आले होते. त्या वेळी ते म्हणाले माझा पराभव झाल्याचे मला दु:ख नाही. तु निवडून आल्याने मला आनंद होत आहे. श्रद्धांजली सभेला काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव,विलासराव वाघमोडे,मंगेश पाटील, मयुरसिंह पाटील,वसंतराव मोहळकर,महेंद्र रेडके,रघुनाथ राऊत,कैलास कदम,पांडूरंग गलांडे,सुरेश मेहेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.