पिंपरी-पतंगाच्या मांजामुळे एका डॉक्टर तरुणीला काल संध्याकाळी प्राण गमवावे लागले. डॉ. कृपाली निकम (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. तब्बल २० मिनिटे ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मात्र, मदतीसाठी एकही वाहन थांबले नाही. वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ही तरुणी डॉक्टर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवाशी आहे.
कासारवाडीत नाशिक फाटा पुलावर डॉ. कृपाली निकम (वय २६) या तरुणीचा लटकणाऱ्या पतंगाच्या मांजामुळे मृत्यू झाला. कृपाली या रविवारी दुचाकीवरुन पिंपळे सौदागरकडून भोसरीकडे जाताना ही घटना घडली. पिंपरीकरांनी वेळीच कृपालीची मदत केली असती तर देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरलाच मदतीअभावी जीव गमवावा लागला नसता.