भुसावळातील घटना ; ‘त्या’ विवाहित महिलेला पोलिसांनी समज देऊन सोडले
भुसावळ- पतीचे परस्त्रीशी असलेले अनैतिक संबंधच पत्नीने उघड करून दोघांना रंगेहाथ पकडत त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढण्याची घटना शहरात सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये घडली. एका हॉटेलमध्ये आपला पती परस्त्री सोबत मौजमस्ती करीत असल्याचे कळताच या महिलेने आपल्या नातेवाईकांना जमा करून त्या महिलेसह पतीला पोलीस ठाण्यात आणत तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकाराची चर्चा कळताच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी त्या महिलेसह पतीची समजूत घालत दोघांना घरी पाठवले. पर-पुरूषासोबत सापडलेली स्त्रीदेखील विवाहित असून कौटुंबिक नुकसान न होण्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल करणे टाळले.