पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीचे निधन

0

पाचोरा । पती पत्नी हे संसाररुपी गाड्याचे दोन चाक असल्याचे बोलले जाते. दोघांनी संगनमताने कुटुंबाच्या उन्नतीसाठी प्रगती करावयाची असते. लग्नाच्या सातफेर्‍यात एकमेकांना सुख, दुःखात आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेली असते. पती-पत्नी हे सुख दु:खाचे भागीदार असतात. क्वचितच जोडप्यांची पूर्ण जीवनभर साथ एकमेकांना लाभते. सोबत तर जगलेच पण सोबतच मरण आले असे भाग्य काही क्वचितांच्या जीवनात येते. अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे घडली आहे. रविवारी 2 रोजी नाचणखेडा येथील भावसिंग गणसिंग पाटील (वय 73) व अलकाबाई भावसिंग पाटील (वय 68) हे वृद्ध दाम्पत्य पाचोरा शहरातील जयकिसन सोसायटीत बर्‍याच वषार्पासून एकटेच राहत होते.

मुले नोकरी निमित्त बाहेर
2 मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने वृद्ध एकमेकांचे वृध्दापकाळातील काठी बणुन सहारा देत जीवन जगत होते. रविवारी पहाटे 2.30 वाजता काही दिवसांपासून किरकोळ आजाराने ग्रस्त असलेले भावसिंग गणसिंग पाटील यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने काही तासातच म्हणजे दुपारी 4.30 वाजता कर्करोगाने आजारी असलेल्या अलकबाई भावसिंग पाटील यांचेही निधन झाले.

सोबत अग्निडाग
प्रत्येक पत्नीची पतीच्या खाद्यांवर प्रेत जावे अशी इच्छा असते. काहींच्या नशीबात ते असतेही. पाटील दांम्पत्यांचे एकमेकांवर जीवापाड असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. पाटील दांम्पत्यांनी जीवापाड कष्ट करुन कुटुंब उभे केले. दोघांनाही सोबतच अग्निडाग देण्यात आला. या अशा दुर्लभ घटनेची परिसरात सर्व चर्चा होत आहे.