पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीची निर्दोष मुक्तता

0

भुसावळ अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

भुसावळ- रागाच्या भरात पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पत्नीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. हत्या झाल्यापासून संशयीत पत्नी कारागृहात होती. निर्दोषत्वानंतर या महिलेची जळगाव कारागृहातून सुटका करण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे 15 जून 2016 रोजी रात्री दीड वाजेच्या दरम्यान पांडुरंग लहानू दुट्टे यांच्या वाड्यात पती हरलाल बिसन बारेला (35) हे झोपेत असताना पत्नी सुरेखा हरलाल बारेला (30) हिने त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली होती. या प्रकरणी विनोद बिसन बारेला याने फिर्याद दिली होती. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार व आरोपी पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर संशयित सुरेखा बारेला यांची अप्पर जिल्हा व सत्र न्या.एस.पी.डोलरे यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांतर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. संजीव वानखेडे व अ‍ॅड. जया झोरे यांनी सहकार्य केले.