भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला भागात पती-पत्नीच्या कौटुंबिक भांडणातून घर पेटवून दिल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात आरोपी फिरोज ऊर्फ पा.बुडन खान (30, जरजीरा पार्क, कुबा मझीतजवळ, ईसाक मंजील कोडवा, पुणे, ह.मु.मोमीनपुरा जाममोहल्ला, भुसावळ) याच्याविरुद्ध पत्नी पत्नी नसीम बी. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता तर तो शनिवारी जाम मोहल्ला भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकात सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार सुनील जोशी, किशोर माहाजन, विकास सातदिवे आदींनी आरोपीला अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक निशिकांत जोशी, नाईक विजय पाटील करीत आहेत.