पती, पत्नीसह मुलास मारहाण; चौघांना 15 हजार रुपयांचा दंड

0

नंदुरबारः शेतीच्या वादातून पती, पत्नी व मुलास मारहाण करणार्‍या चौघांना धडगाव येथील प्रथम न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी 15 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रूक येथील लालशा लखमा पावरा यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्यांच्या सोबत राहणारा गुराखी जोदा पावरा याला 29 ऑक्टोबर 2015 रोजी मारहाण होत असताना लालशा लखमा पावरा यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोड्या दिल्या पावरा, जोलाड्या दिल्या पावरा, गुंजात्या दिल्या पावरा, बोला दिल्या पावरा यांनी लालशा पावरा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करत धमकी दिली. न्या. जोशी यांच्या समक्ष या खटल्याचे कामकाज झाले.

याप्रकरणी चौघांना 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सरकारी वकील म्हणून आर. डी. बिर्‍हाडे यांनी काम पाहिले.