पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची पोत लांबविली

0

जळगाव। शहरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुन्हेगारीच्या घटनांना लगाम लावण्यात मात्र पोलीस प्रशासनाल अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच शुक्रवारी सकाळी 10.10 वाजेच्या सुमारास रामानंदनगर परीसरात पल्सरवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका सेवा निवृत्त शिक्षीकेच्या गळ्यातील तब्बल 54 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत ओढून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष विचलित करून तरूणाने ओढली पोत
रामानंदनगर परीसरातील चंद्रमा अपार्टमेंट मधील रहिवासी सेवा निवृत्त शिक्षीका विजया नारायण कदम यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने ओढून नेली आहे. शुक्रवारी सकाळी 10.10 वाजेच्या सुमारास विजया कदम या चंद्रमा अपार्टमेंट परीसरात उभ्या असतांना तेथे पल्सर या दुचाकीवरून दोन अज्ञात तरून आले. यानंतर कदम यांच्याजवळ दुचाकी थांबवून मागे बसलेला तरूण खाली उतरूण कदम यांच्याकडे आला आणिक पत्ता विचारू लागला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलीत करून महिलेच्या गळयातील 22.5 ग्रॅम वजनाची सुमारे 54 हजार रूपये किंमतीची सोन्याची काळ्या मण्यांची पोत ओगढून नेली. ही घटना घडताच विजया यांनी आरडा ओरड केली. मात्र चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेसंदर्भात त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात जावून घटनेची हकीकत सांगीतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंवी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरीक्षक घोळवे हे करीत आहेत.