नंदुरबार- पत्नीचा गळा आवळून खून करणार्या पतीला जन्मठेेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एल. व्यास यांनी हा निकाल दिला. धडगाव येथील सरकारी रुग्णालयात उज्ज्वला काळूसिंग वळवी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्या 9 सप्टेंबर 2017 रोजी कामावर असताना त्यांचा पती काळूसिंग मद्यप्राशन करून आला. त्याचा जाब विचारल्याने काळूसिंगने उज्ज्वला वळवी यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह स्वच्छतागृहात आढळला होता. या प्रकरणी काळूसिंग वळवीवर गुन्हा दाखल झाला. सरकारी वकील विनोद गोसावी यांनी युक्तिवाद केला. काळूसिंग दोषी आढळल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.