पारोळा : विवाहितेच्या पतीने आपल्याच पत्नीसोबतचे अश्लील फोटो व्हायरल केल्याने त्याच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत पतीने पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर कृत्याचे चित्रीकरण करून व्हायरल केले तसेच व्हाटसअॅपला स्टेटसही ठेवले. याप्रकरणी पारोळ्यातील पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडीतेने दिली तक्रार
या संदर्भात पीडीत पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने 1 सप्टेंबर 2021 रोजी ते 26 फेब्रुवारी 2022 दरम्यान जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. पीडीतेची बदनामी व्हावी या उद्देशाने अनैसर्गिक कृत्याचे त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हायरल केले तसेच व्हाटसअॅप नंबरवर स्टेटस्देखील ठेवले. पीडीतेच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.