धुळे । पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या नेत्या डॉ. माधुरी बोरसे यांनी पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी मोफत रोगनिदान शिबिर घेतले. शिबिरात 135 जणांची तपासणी झाली. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. शिबिराचे उद्घाटन देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते मदनलालजी मिश्रा, विजय पाच्छापूरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रत्नाताई बडगुजर, माजी महापौर जयश्री अहिरराव, विनोद मोराणकर, सुरेश पाटील, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, सुनील नेरकर, योगेश मुकुंदे, भिकन वराडे, प्रकाशचंद छेतीया, जितूभाई शाह, चेतन मंडोरे, अमृता पाटील, माजी उपमहापौर फारुख शाह, नगरसेवक फिरोझ लाला आदी अनेक महिला आघाडीच्या व भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उल्लेखनीय काम करणार्या पत्रकारांचा सत्कार
डॉ.माधुरी बोरसे यांनी सांगितले की, गेल्या पंधरा वर्षांच्या काळात अनेक अनुभव आलेत, शिबिरेही घेतली. मात्र, पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी प्रथमच शिबिर घेत आहे. पत्रकारांना सतत दगदग करावी लागते. त्यामुळे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी हा उपक्रम घेतला आहे. पत्रकारांच्या कुटुंबीयांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर आतापर्यंत उपचार केलेल्या रुग्णांचा डाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाले आहे. श्वास निरामय रुग्णालयातर्फे पत्रकारांना नेहमी मदत केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. दरवर्षी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शिबीर आयोजित करण्याचे मानस त्यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन हिरामण आप्पा गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेमंत भाऊ मदाने यांच्यासह वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार बांधवांचे सत्कार करण्यात आले. यावेळी अनेक वृत्तपत्राचे व वृत्तवाहिनीचे सन्मानीय प्रतिनिधी उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेश पाटील, डॉ पंकज बिरारी, डॉ. तुषार चव्हाण, डॉ. हर्षद सोनवणे-पाटील, डॉ. सुष्मा थोरात, डॉ. गीतांजली सोनवणे, डॉ. आशिष छाजेड, डॉ. सुधीर सिंघवी, डॉ. तुषार कानडे, डॉ. अविनाश सैंदाणे, डॉ. फैजी सिद्दीकी, डॉ. अमित पाटील, डॉ.नितीन पाटील, अनिल चौधरी, विजय भट्टड, परवेझ शाह, हाजी मसूद अन्सारी, मतीन खाटीक, विजय शेलार, कुणाल चौधरी, दिनेश बागुल, सागर चौधरी, युवराज पाटील, सागर कोडगीर, प्रथमेश गांधी, नरेंद्र कापडणीस प्रशांत जैन, राहुल खरात, प्रमिला साबळे आदींनी परिश्रम
घेतले.