पत्रकारांना घरकुलासाठी शासकीय भूखंड द्या

0

नंदुरबार। जिल्ह्यातील पत्रकारांसाठी हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी शासकीय भूखंड देण्यात यावा अशी मागणी जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाने एका निवेदनाद्वारे केले आहे. नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, चंद्रशेखर बेहेरे, धर्मेंद्र पाटील, रमेश महाजन, संतोष पाटील, रत्नदिप पाटील, मनोज समशेर, गजेंद्रसिंग राजपूत, प्रल्हाद अल्हाट आदी पत्रकारांनी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेवून निवेदन दिले.

जिल्हाधिकार्‍यांना दिल्या शुभेच्छा
निवदेनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी व सचिव योगेंद्र जोशी यांची स्वाक्षरी आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांशी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी पत्रकार बांधवांनी सविस्तर चर्चा केली. तसेच शासनातर्फे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांचा गौरव करण्यात आल्याने यानिमित्त पत्रकारांनी जिल्हाधिकार्‍यार्ंंना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार बांधवांच्या सर्व समस्या सोडविणार असल्याची ग्वाही दिली.