पत्रकार करतात समाज परीवर्तन

0

शिरूर । पत्रकार लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असुन शस्रापेक्षाही जास्त धार लेखणीला आहे. पत्रकार आपल्या लेखणीद्वारे सकारात्मक दृष्टीने लेखन करून समाज परिवर्तनाचे चांगले काम करत असतात, असे मत शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दर्पणकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच बोर्‍हाडे मळा येथील गोकुळ वृध्दाश्रमात सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले. अन्न-धान्य, ब्लँकेट व औषधांचेही वाटप यावेळी करण्यात आले. पत्रकारांच्या लेखणीत मोठी ताकद असून ते लेखणीच्याआधारे समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात, असे पाचर्णे यांनी पुढे सांगितले. यावेळी तहसिलदार रणजीत भोसले, संदिप जठार, राजेंद्र कुंटे, मंगेश खांडरे, आबासाहेब सरोदे, सिताराम लांडगे, किरण बनकर, संतोष शितोळे, पोपट शेलार, संजय बारवकर, गोकुळ मुथा आदींसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.