पत्रकार, कलाकार, खेळाडू यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा विक्रम पवार यांचे प्रतिपादन

पिंपरी : राज्यपाल नियुक्त आमदारपद हे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार, खेळाडू, विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक यांना देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात विक्रम पवार यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागा रिक्त आहेत. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार, खेळाडू यांचा विचार केला. नंतर या पदांच्या नियुक्तीचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यामुळे गेल्या सुमारे चार

वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारपदे कोणालाच दिली गेलेली नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच राज्यपाल नियुक्त आमदार पदावर १२ जणांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त या १२ जागांवर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलाकार, खेळाडू, विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व साहित्यिक यांना संधी देण्याची काळाची गरज आहे. कारण सध्याचे गढूळ झालेले. राजकारण पाहता राज्यपाल नियुक्त १२ आमदार पदांवर खरोखरच समाजाची सेवा करणाऱ्यांची आणि देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू, पत्रकार, साहित्यक यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.