तळोदा । प्रशासकीय मध्यवर्ती इमारती आवारात पथदीवे नसल्याने परिसरात रात्री अंधार होत असल्याने रात्री कामानिमित्त आलेल्या नागरिकांना अनेक अडचणी तोंड दयावे लागत आहे. शहारतील व तालुक्यांतील जनतेला आपल्या कामानिमित्त विविध कार्यालयामध्ये भंटकती करावी लागत होती. ही त्यांची भटकंती होवू नये म्हणून शासनाने सर्व कार्यालये एका इमारती असावेत हया हेतूने लाखो रुपये खर्च करून प्रशासकी मध्यवर्ती इमारत बाधली आहे. या इमारतीत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ट्रेझरी, प्रान्तकार्यालय, तालुका कृषी कार्यालय, भूमापन कार्यालय आहेत. तसेच शेजारी पंचायत समिती कार्यलय व आवार आहे. या दोन्ही आवारांमध्ये पथदिव्यांची सोय करण्याआली नाही. यामुळे या आवारात सर्वत्र अंधार पसरलेला असतो.
अधिकार्यांचे दुर्लक्ष
या इमारतीत पोलीस स्टेशन असल्यामुळे तालुक्यातील जनतेला रात्री-अपरात्री आपल्या समस्यांसाठी पोलीस स्टेशन गाठावे लागते. तसेच पोलीस कर्मचारी, तहसील कर्मचारी आदि कार्यालयातील कर्मचार्यांना आपले कार्यालयीनकाम पूर्ण करण्यासाठी काही वेळा रात्री उशीरा पर्यंत कार्यालयात थांबावे लागते. आवारात पथदिव्यांची सोय नसल्याने अनेक अडचणींना तोंड दयावे लागत असते. अंधारात मोकाट कुत्रे, डुक्कर आदींच्या सामना करावा लागतो. तालुक्यातील प्रमुख अधिकार्यांची कार्यालये या आवारात असून आवारात पथदिव्यांचा अभाव आहे. तालुक्यातील विकास आराखडा ज्या कार्यालयात तयार होतो त्या पंचायत समितीचे सभागृह व गटविकास अधिकार्यांचे कार्यालय देखील याच परिसरात थाटले आहे. या अधिकार्यांनी याकड़े दुर्लक्ष केले असल्यानेच परिसरात अंधार पसरला असल्याची चर्चा शहरात होत आहे.