मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे
पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना महापालिकेतर्फे मोबाईल सिमकार्ड दिले जाते. त्याचे शूल्कही पालिका संबंधित कंपनीला अदा करते. या मोबाईल सेवेसाठी आगामी काळात 1 कोटी 25 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या मंजुरीने स्थायीसमोर मान्यतेसाठी आणला आहे.
वोडाफोन, आयडीया आणि एअरटेल कंपनीचे निविदा दर प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये वोडाफोन कंपनीने 28.50 टक्के, आयडिया कंपनीने 26.00 टक्के आणि एअरटेल कंपनीने 10.50 टक्के कमी दर निश्चित केले आहेत. वोडाफोन कंपनीकडून हे काम करवून घेण्यासाठी त्यांच्यासोबत करारनामा करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.