पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2017 जाहीर

0

पिंपरी-चिंचवड : शांतीसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे उर्जास्त्रोत पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान (नेहरू युवा केंद्र, युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार संलग्नित) तर्फे देण्यात येणारे ‘पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2017‘ जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचा वितरण सोहळा व गांधीवादी मेळावा 27 एप्रिल रोजी सायंकाळी सहाला सावित्रीबाई फुले स्मारक भवन, सेंट्रल फायर ब्रिगेडजवळ, लोहियानगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी दिली आहे.

यांना जाहीर झाले पुरस्कार
या वर्षी पिंपरी-चिंचवड येथील अनिल परतणे (उद्योजक, सामाजिक), डॉ. संजय कोलते (प्रशासकीय सेवा), प्रा. गणपत थोरात (लेखक), बारामती येथील शेवंतीलाल दोशी (वैद्यकीय, सामाजिक), बुलढाणा येथील डी. के. देशमुख (सामाजिक), डॉ. राजेंद्र गुप्ता (वैद्यकीय), डॉ. राजेंद्र पाटील (शैक्षणिक), दत्तात्रय पाटील (सामाजिक, कामगार चळवळ), नामदेव भोसले (सामाजिक) यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2017‘ जाहीर झाले आहेत. तसेच डॉ. बी. एल. तारी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती लाभणार
या पुरस्कार वितरण सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. महापौर नितीन काळजे, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाजीराव जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे जि.प.चे अध्यक्ष विश्‍वास देवकाते असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त, नाशिक डॉ. संजय कोलते, सिद्धीविनायक गु्रपचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक ’जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदन ढाके, एल.एम.सी. गु्रपचे अध्यक्ष डॉ. मिलिंद चौधरी, पत्रकार एस. एल. खुटवड, नगरसेवक नामदेव ढाके, समता भ्रातृमंडळ, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष रवींद्र बर्‍हाटे, उद्योजक अनिल परतणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.