पद्मालय नगरातील समस्यांसाठी नगरसेविकाचा पुढाकार

0

एरंडोल । शहरातील नवीन भागात असलेली धरणगाव रस्त्यालगत पद्मालय नगर ही वसाहत आहे. त्या ठिकाणी वसाहत सुरु झाल्यापासून अनेक समस्या आहेत. त्यातील महत्वाची समस्या आहे सांडपाण्याची. सांडपाण्याच्या समस्येसाठी वसाहत धारकांनी वारंवार नगरपालिकेस तक्रार व विनंती केली होती. परंतु आजतागायत या समस्येकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. परंतु नुकत्याच या भागातून निवडून आलेल्या नगरसेविका वर्षा राजेंद्र शिंदे यांनी तत्परतेने नगर पालिका मुख्याधिकार्‍यांच्या सोबत भेट देऊन समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

नगरसेविका वर्षा शिंदे यांनी केली पाहणी
एरंडोल शहराच्या लगत असलेली नवीन वसाहत पद्मालय नगर हे आधी नगरपालिका हद्दी बाहेर असलेली वसाहत होती परंतु नुकत्याच झालेल्या हद्द वाढीत तिचा समावेश करण्यात आला आहे. सदर वसाहत हि गेल्या 10 ते 15 वर्षांपूर्वी याठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. या वसाहतीत शंभर घर असून तब्बल 500 लोक रहिवास आहे. वसाहतीतील रहिवाशी रहिवासासाठी आल्यापासूनच अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. आधी पंधरा वर्ष हद्द वाढ नसल्याने स्वखर्चाने अनेक सुविधा करण्याचा प्रयत्न रहिवाश्यांनी केला परंतु तोडक्या मोडक्या खर्चाने केलेल्या समस्या काही काळच टिकत होत्या. परंतु नुकत्याच झालेल्या हद्द वाढीमुळे व या परिसराला नवीन नगरसेविका मिळाल्या व त्यांनी तत्परतेने मुख्याधिकारी विशाखा मोटधरे, न.पा.अभियंता पंकज पन्हाळे यांच्यासोबत या वसाहतीला भेट देऊन समस्या लवकरात लवकर मार्गी लाऊन बाकी समस्यांचेही भविष्यात निपटारा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या सोबत राजेंद्र शिंदे, विजय चव्हाण, सुनील बडगे, अरुण वारुळे, संतोष पवार, संजय मरसाळे, प्रवीण आहिरे, पी.पी.सोनार, भीमराव मालचे, बाळु मोरे व मधुकर देवरे आदी वसाहतीतील रहिवाशी होते.