मुंबई : पद्मावती चित्रपटावरून बिघडलेली परिस्थिती पाहता प्रदर्शन थांबवण्यात आले होते. अखेर, सेन्सॉरने यावर तोडगा काढत पाच बदल करण्यास सांगत चित्रपटाचे शीर्षक पद्मावत करण्याचा निर्णय दिला. मात्र प्रत्यक्षात पद्मावतमधील पाच बदल नसून तब्बल 300हून अधिक बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पद्मावत चित्रपटातील मेवाड, दिल्ली, चित्तौडगढ या शब्दांचा उल्लेख काढण्यात येणार आहे. तसेच, हा पूर्णपणे काल्पनिक चित्रपट असेल. सेन्सॉरच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांना अलाउद्दीन खिल्जी नक्की कुठून आला आणि त्याने कुठे लढाई केली याचा काहीच संदर्भ लागणार नाही. या सगळ्यात भन्साळी यांची संपूर्ण टीम मात्र पुन्हा चित्रपटाचे संकलन करण्यात एकवटली आहे.