भुसावळ । संजय लीला भंन्साळी यांनी दिग्दर्शित चित्रपटात राजपूत समाजातील राणी पद्मावती यांच्या इतिहासात ढवळा-ढवळ करीत व विक्षिप्त चित्रीकरण करून राणी पद्मावती या चित्रपटाद्वारे राजपूत समाजाच्या भावनांचा अनादर केला असून हा चित्रपट जिल्हाभरात कोठेही प्रदर्शित होवू नये अन्यथा होणार्या परीणामास प्रशासन जबादार राहील, अशा निर्वाणीच्या ईशार्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकार्यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अॅड. शाम श्रीगोंदेकर, विलास मुळे, उमाकांत शर्मा, नीलेश महाजन, बबलू बर्हाटे, अबरार शेख, संजय वानखेडे, मिलींद कापडे, निखिल सपकाळे, नामदेव बर्हाटे, लोकेश ढाके आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना निवेदन
मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील राजपूत समाज बांधवांतर्फे नायब तहसीलदार शांताराम सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. तसेच या चित्रपटावर बंदीची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना दीपक पवार, भगवानसिंग पवार, कैलास राजपुत, मानसिंग पवार अर्जुनसिंग भटकर शुभम भटकर,अजयसिंग गायकवाड , संदीप पवार, गोपाल जाधव, सुनील ठाकूर, छोटु जाधव, गौरव चव्हाण, सुनील गरुड, शुभम राजपूत, किरण राजपूत, गोविंद राजपूत, वैभव राजपूत, पवन महाले, नितीन पवार , सागर पवार, आकाश पवार, तणमण राजपूत, सागर वाघ व समाजबांधव उपस्थित होते.