चिंबळी- चिंबळी (ता. खेड) येथील ग्रामस्थांचे असलेले ग्रामदैवत पद्मावती देवी व सावता महाराज मंदिराच्या परिसरातील घनकचरा उचलून स्वच्छता अभियान अतर्गंत सर्व परिसरात सापसफाई करण्यात आली.
चिंबळीफाटा येथील श्रीसमर्थ स्कुलच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही मदिंराचा परिसर स्वच्छ करण्यात आला, अशी महिती प्राचार्य अनिता टिळेकर यांनी दिली.यामध्ये स्कुलच्या वर्गशिक्षिका ललिता बडदे, शोभा तांबे, रत्नाकर, वाघमारे, मोनाली मुंगसे, सुनिल आहेर, अजित थोरात, निखिल काबंळे, अश्विनी बागडे, सुरभि बांदेकर आदि शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतले असल्याने सस्थापंक अध्यक्ष शिवाजी गवारे व ग्रामस्थांनी या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.