पद्मावत विरोधात कोळीद येथे जल आंदोलन

0

दोंडाईचा । चित्तोडची महाराणी, हिंदू सती पद्मावती यांचा इतिहास त्याग, समर्पण, बलिदान, पावित्र्य असतांना पद्मावत सिनेमात चुकीचा इतिहास दाखवून राजपुत समाजाच्या भावना दुखविण्यात आल्या आहे. हा चित्रपट प्रदर्शित होवू नये म्हणून सर्वत्र विरोध होत असून याच विरोधाचा एक भाग म्हणून मंगळवारी 23 रोजी शिंदखेडा तालुक्यातील कोळीद गावालगतच्या तापी पात्रात उभे राहून राजपुत समाजातील लोकांनी जलआंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाला पुर्वकल्पना असल्याने तहसिलदार सुदाम पाटील, दोंडाईचाचे एपीआय हेमंत पाटील हे सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी हजर झाले आहेत. त्यांनी आंदोलकांशी चर्चाकरुन हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तरीही दुपारी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरुच होते. पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शनच होवू नये अशी राजपुत समाजाची भुमिका असून अनेक राज्यात पद्मावतच्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले आहे.

थिएटर चालकांचा पद्मावत न दाखविण्याचा निर्णय
दोंडाईचातही सिने थिएटर मालकांनी पद्मावत न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही सिने निर्माते संजय लिला भंसाळी हे 25 जानवेरीला पद्मावत प्रदर्शित होणारच अशी ठाम भुमिका मांडत असल्याने प्रशासनानेच यावर ठोस भुमिका घ्यावी अशी मागणीकरीत जल आंदोलन करण्यात आले. जो पावेतो प्रशासनाची भुमिका कळत नाही तो पावेतो तापी पात्रातून बाहेर न येण्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनीव्यक्त केल्याने महसुल आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक होत होती. या आंदोलनात डॉ.भरत राजपूत, राकेश राजपूत, पिंटू राजपूत, चंद्रकला सिसोदिया, जयदेवसिंग राजपूत, सागर गिरासे, कुलदीप दादा,चेतन राजपूत,मुकेश, महेंद्र राजपूत, रामसिंग राजपूत, धीरज राजपूत, योगेश राजपूत,निलेश राजपूत, ईश्‍वरसिंग राजपूत, नयन राजपूत यांच्यासह शेकडो राजपूत समाजबांधव सहभागी झाले होते.