धुळे (प्रतिनिधी) – ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या कारणावरून आमोदे गावाजवळ काहींनी बस जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली़ बसचालक जखमी झाला. सुदैवाने बसमधील प्रवाशी काही क्षणातच बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ या घटनेत बसचे लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले़ शिरपुरात मंगळवारी रात्री १०़२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ शिरपूर डेपोची गाडी क्रमांक एम़एच़२०-बीएल-१३४९ धुळ्याकडे जाण्यासाठी निघाली असतांना मार्गावरील आमोदे गावाजवळ काहींनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्यात तर काहींनी रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गाडीतील प्रवाशी लागलीच खाली उतरल्यामुळे मोठी दुघर्टना टळली़ मात्र गाडीचालक नंदलाल परबत कंखरे हे जखमी झालेत़ चालक कंखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम, योगेश, राहूल, प्रशांत सह इतर १६ जणांविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १२० ब, १४३, १४७, ३४१, ३३७, ३०७, २७ प्रमाणे बस जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रांची होती आंदोलनात उपस्थिती
या आंदोलनालनात संजय वाल्हे, जगदीश राणा, अजित राजपूत, रावसाहेब गिरासे, भिमसिंग राजपूत, दरबारसिंग गिरासे, अलोक रघुवंशी,राजु पवार, मयुर पवार, नितीन कोटेचा, सचिन राजपूत,जसपाल सिसोदिया, अनिल थोरात यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे,नाना कदम, प्रदीप जाधव,पप्पूमाने,रणजीत राजे भोसले, साहेबराव देसाई, लहू पाटील, रजनीश निंबाळकर, कुणाल पवार, गौरव पवार, अमोल मराठे, गौरव मराठे आदी रस्त्यावर उतरले होते. बराच काळ वाहतूक खोळंबली होती.