परदेशात नोकरीच्या आमिषाने मुक्ताईनगराच्या तरुणाला गंडवले

0

एक लाख 35 हजार रुपये हडपले : लंडनसह दिल्लीतील ठगांविरुद्ध पोलिसात गुन्हा

मुक्ताईनगर- परदेशात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून मुक्ताईनगरच्या तरुणाची एक लाख 35 हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीसह लंडनमधील ठगांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार अतुल अरुण तायडे (25, रा.शिव कॉलनी, मुक्ताईगर) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पीटर अँथोनी जॉन (रा.यु.के.लंडन) व जॉन स्मिथ (दिल्ली) यांनी 27 फेब्रुवारी ते 15 मार्च 2018 दरम्यान तक्रारदाराच्या मोबाईलवर फोन करून परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्यासाठी वेळोवेळी रकमेची मागणी केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत भरणा करण्यात आला. चेकद्वारे, मोबाईल बँकींगद्वारे, ई मेलद्वारे आतापर्यंत तक्रारदाराने एक लाख 35 हजार 760 रुपये भरले मात्र नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत.