परदेशात प्रशिक्षक रवि शास्त्री यांची कमकुवत बाजू उघड

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) प्रशासकीय समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जसे भक्त आहेत तसे बीसीसीआयमध्ये कर्णधार विराट कोहलीचे भक्त असल्याची टीका गुहा यांनी केली. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून गुहा यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले. प्रसिद्ध इतिहासकार असलेल्या रामचंद्र गुहा यांनी रवि शास्त्री यांना सर्वात कमकुवत प्रशिक्षक असे संबोधले आहे. गुहा यांनी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यातील खराब कामगिरीवरुन निशाणा साधला. गुहांनी प्रमुख्याने कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अधिकारी, निवडकर्ते, आणि कोचिंग स्टाफवरही सडकून टीका केली आहे. केंद्रात जसे मोदी भक्त आहेत तसे हे सर्व विराट भक्त असल्याची टीका गुहांनी केली.

कुंबळे महान गोलंदाज
तर दुसरीकडे गुहा यांनी माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंची स्तुती केली. अनिल कुंबळे भारतीय क्रिकेटमधील एक महान गोलंदाज आहे. तसेच ते एक उत्तम प्रशिक्षकही होते. कुंबळेंची भुमिका ठाम होती. ते प्रत्येक वेळेस कर्णधार कोहलीच्या मागण्या मान्य करत नव्हते. यामुळेच अनिल कुंबळेंना पदावरून दुर करण्यात आल्याचा खुलासा रामचंद्र गुहा यांनी केला.