भुसावळ- रेल्वेत चढताना तोल जावून पडल्याने परप्रांतीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.5 वाजता घडली. प्रमोदकुमार दशरथ यादव (22, रा. आगरा ठाणा, पोलिस ठाणे सोना ठाणा, जमोई, विहार) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. प्लॅटफॉर्म चार वरून पटना एक्स्प्रेसमध्ये बसत असलेल्या प्रमोदकुमार यादव या युवकाचा तोल गेल्याने तो गाडीच्या खाली आल्याने पोटापासून कापला गेला. लोहमार्गचे सहायक फौजदार संजय साळुंखे व निलेश कुसराम यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. अन्य प्रवाशांच्या सहकार्याने त्यांनी मृत युवकाचा दोन्ही कापलेले भाग उचलून जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आधारकार्डावरून युवकाच्या गावातील पोलिस ठाण्याशी व नंतर कुटुंंबियांशी संपर्क साधण्यात आला.