जळगाव :- पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील पसार असलेल्या कुविख्यात आरोपी दीपकसिंग प्रकाशसिंग जुन्नी (30, राजीव गांधी नगर, जळगाव, ह.मु. परभणी) यास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदारी सुभाष पाटील, नाईक रवींद्र पाटील, प्रकाश महाजन, अशोक चौधरी, विनायक पाटील, इद्रीस पठाण आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.