शहादा । तालुक्यातील शेतकर्यांची उसाची रक्कम गुजरात राज्यातील मरोली येथील साखर कारखान्याने थकविल्याने उस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी आता आपल्या उसाच्या पैशासाठी गुजरात राज्यात फेर्या मारत आहे. गेल्या अनेक वर्षापासून उसाला अधिक भाव देण्याचे अमीष दाखवून शहाद्या तालुक्यातील उस परप्रांतात विशेषतः गुजरात व मध्यप्रदेश सोबत नगर नाशिक जिल्ह्यात नेला जातो
जास्त भावाचे आमिष दाखवून लूट!
शेतकर्यांना उसाचे पेमेंट लगेच दिले जाते असे आमिष दाखवून उस कारखान्यांवर नेला जातो. तसेच उसाची पळवापळवी केल्यामुळे अनेक वाद होऊन पोलिसांमध्ये देखील तक्रारी झाल्या आहेत. तालुक्यातील उस बाहेर गेल्याने स्थानिक कारखान्यांना उस कमी पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे गळीत हंगाम लवकर संपत आहे. दरवर्षी दोन महिने अगोदर बाहेरच्या कारखान्याचे अधिकारी उसासाठी शहाद्यात दाखल होतात. शेतकर्यांनी त्यांच्या उस कोठे द्यावा? हा त्यांच्या प्रश्न असला तरी त्यांची फसवणूक होत असल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. सातपुडा साखर कारखाना मार्फत दरवर्षी कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी उस उत्पादक शेतकर्यांना सभासदांना बाहेरच्या कारखान्यांना उस देउ नये म्हणून आवाहन करत असतात मात्र काही सभासद बाहेर उस देउन मोकळे होतात. सातपुडा साखर कारखाना आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात गुजरात राज्यातील मरोली कारखान्याने शेतकर्यांची रक्कम थाक्विल्याची चर्चा होती. कारखान्याने दोनशेपेक्षा जास्त शेतकर्यांच उस नेला आहे पण शेतकर्यांना उसाची रक्कम दिली नसल्याने शेतकर्यांना सतत मरोलीला चकरा माराव्या लागत आहेत.