भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीन राज्यातील सत्ता गेली आहे. दरम्यान या पराभवाची जबाबदारी स्वीकारत भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी राजीनामा दिला आहे. परंतू राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हा राजीनामा नामंजूर केला आहे. राकेश सिंह यांच्या अगोदर महाधिवक्ता पुरूषेन्द्र कौरव यांनी देखील राजीनामा सचिव यांच्याकडे दिला आहे.